बंद

    सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना

    प्रकाशित तारीख: October 28, 2023

    10 जून 1966 रोजी जन्म.

    1989 मध्ये पुणे विद्यापीठातून बीएसएल एलएलबी पूर्ण केले आणि त्यानंतर 1992 मध्ये पुणे विद्यापीठातून एलएलएम पूर्ण केले.

    1995 ला सांगली येथे दिवाणी न्यायाधीश क.स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून न्यायसंस्थेत रुजू झाल्या. 2003 मध्ये त्यांची कोल्हापूर येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर म्हणून आणि 2011 मध्ये मुंबई येथे
    जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्याच पदावर काम केले. तसेच मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण मुंबईचे पीठासीन अधिकारी म्हणून काम केले.

    त्यानंतर त्यांची 08 सप्टेंबर 2023 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून न्यायिक जिल्हा जालना येथे पदोन्नती झाली.