बंद
    • जिल्हा न्यायालय, जालना संकुल

      जिल्हा न्यायालय, जालना संकुल

    जिल्हा न्यायायलयाबद्दल

    जालना न्यायिक जिल्हा पूर्वी औरंगाबाद न्यायिक जिल्हयातंर्गत होता. दिनांक ०१/०५/१९८१ रोजी अंबड, परतूर, भोकरदन आणि जाफ्राबाद या चार तालुक्यांसह त्याची स्थापना करण्यात आली. दिनांक २२/०८/१९९२ रोजी माननीय न्यायमूर्ती श्री.मकरंद वैद्य, न्यायाधीश, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या शुभ हस्ते जिल्हा न्यायालय आणि मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) यांच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. दोन्ही इमारती अंबड रोडला लागून असलेल्या सर्वे नं. ४८८ मधील १० एकर मध्ये आहेत. हे रेल्वे स्टेशनपासून २ कि.मी. आणि बस स्टँडपासून ४ कि.मी. अंतरावर आहे.
    जिल्हा न्यायालयाची इमारत तीन मजली असून दिवाणी न्यायालय व.स्तर जालनाची इमारत दोन मजली आहे यात तळमजल्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय आणि पहिल्या मजल्यावर दिवाणी न्यायालय (व.स्तर), जालना आहे. जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत प्रबंधक कार्यालय, न्यायिक विभाग, सांख्यिकी शाखा, प्रशासन शाखा, न्यायालय व्यवस्थापक कक्ष, न्यायालयाचा न्यायिक विभाग, मुद्देमाल कक्ष, वित्त विभागासह सुरक्षा रूम आणि अभिलेख कक्षासह असलेली सात न्यायदान कक्ष आहेत. दिवाणी न्यायालय (व.स्तर), जालना आणि मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, जालना च्या इमारतीत नऊ न्यायदान कक्ष, अभिलेख कक्ष, सुरक्षा कक्षासह लेखा व वित्त विभाग, मुद्देमाल कक्ष, दिवाणी बंदी, बेलीफ कक्ष, ग्रंथालय, वकील संघ आणि दिवाणी व फौजदारी विभाग आहेत.
    न्यायिक जिल्हा जालन्यात दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जाफ्राबाद न्यायालयाची स्थापना मार्च १९८९ मध्ये करण्यात आली. त्या नवीन इमारतीचे उद्घाटन माननीय न्यायमूर्ती श्री. व्ही.के. बर्डे,[...]

    अधिक वाचा
    Honble CJ
    सन्माननीय सरन्यायाधीश उच्च न्यायालय मुंबई सन्माननीय श्री सरन्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय
    SCM
    सन्माननीय पालक न्यायमूर्ती सन्माननीय श्री. न्यायमूर्ती एस.सी. मोरे
    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना
    सन्माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जालना सन्माननीय श्रीमती वर्षा एम. मोहिते

    ई- न्यायालय सेवा

    ई न्यायालय सेवा उपयोजक (अँप)

    भारतातील दुययम न्यायालयांतील तसेच बहुतांश उच्च न्यायालयातील प्रकरणांची माहिती देते व दिनदर्शिका, सावधानपत्र (कॅव्हिएट) शोध आणि न्यायालय परिसराचे नकाशावर स्थान या सुविधा पुरविते.

    परतीच्या एस.एम.एस. व्दारे तुमच्या केसची सद्यस्थिती जाणून घ्या
    एस.एम.एस.
    ई न्यायालय 9766899899 या क्रमांकावर पाठवावा